You are currently viewing चवदार तळे स्मृती दिन कवी मनोहर पवार यांचे काव्य वाचन..

चवदार तळे स्मृती दिन कवी मनोहर पवार यांचे काव्य वाचन..

पुणे :

 

चिखली येथिल जेष्ठ कवी मनोहर पवार यांचे चवदार तळ्याच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने महात्मा फुले डॉ.बाबा साहेब आंबेडकर वाटीकेत काव्य वाचनाचा कार्यक्रम साजरा झाला.

चिखली येथिल कवी व सामाजिक कार्यकर्ते संजय वाकोडे हे दरवर्षी चवदार तळे स्मृतीदिन साजरा करीत असतात.

यावर्षीही त्यांनी सदर कार्यकमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये शहरातील अनेक जेष्ठ कवी लेखक समाज कार्यकर्ते हजर होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून व महामानवांना वंदन करून व दिप प्रज्वलनानंतर संजय वाकोडे आयोजक यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रासंगिक कविता वाचन कार्यक्रम सुरु झाला. कवी मिलींद भंडारे यांनी सुश्राव्य गायन करीत कार्यक्रमात रंगत आनली. कवी किसन पिसे यांनी शेतकरी आत्महत्या कर्ज या विषयांतर करून कविता सादर केली मधूकर काळे यांनी आपली रचना सादर केली. त्यानंतर चिखली येथिल कवी मनोहर पवार यांनी खालील रचना सादर केली – ती अशी –

चवदार तळ्याकाठी

बहुजनांची दाटी ।

महाडच्या मातीसाठी

अस्पृश्या साठी एल्गार ।

तळ्याचे पाणी चवदार ॥

 

तर आपल्या कवितेत पुढे कवी मनोहर पवार म्हणतात – तुम्ही आशा

विश्वास बहुजनांचे ।

जानिले दुखः दीन दलितांचे ॥

 

जात मानुसकी जपले नाते ।

पिऊनी पाणी त्या ।

चवदार तळ्याचे ॥

बंड केले मानवतेचे ।

तुम्ही आशा विश्वास

बहुजनांचे ॥

 

असेच सुंदर काव्य रचना सादर करून कवी मनोहर पवार यांनी रसिकांची मने जिंकली . यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते . त्यामध्ये डॉ. ज्योती शिव शंकर खेडेकर ‘ संघ मित्रा कस्तुरे ‘ लेखक कुटे सर प्रा . डॉ. प्रफुल्ल गवई सर आदी अनेक मान्यवर तथा कवी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवर कवी व सामाजिक कार्यकर्ते यांचा प्रशस्ती पत्र देवून सन्मान करण्यात आला . सदर कार्यकम यशस्वी करण्यास भालेराव ‘ खंडागळे ‘ आदी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =