*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वसंत आला*
——————————————-
लाल, गुलाबी, निळा,जांभळा
घाणेरीचा थाट आगळा
मधुमालतीने भरले कुंपण
बकुळ फुलांनी सजले अंगण
शुभ्र पांढरी फुले मोगरी
घमघम करती वेली वरती
बहाव्याचे लोलक पिवळे
घाणेरीचे रूप आगळे
भल्या सकाळी सडा घालती
जकरंडाची फुले सानुली
तप्त उन्हातही सुभग भासती
फुलारलेल्या बोगन वेली
खुरचाफ्याचे देठ दुरंगी
नाजुक इवली फुले सुरंगी
काटे सावर गेंद गुलाबी
रातराणीचा गंध शराबी
झळा उन्हाळी तरी निळाई
रंगामधे सचैल म्हाला
रसिक मनाने आस्वादताना
वसंत सारा सजून गेला
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
@सर्व हक्क सुरक्षित