You are currently viewing ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत बांदा केंद्रशाळेच्या श्रेया परब व दुर्वा नाटेकर यांचे सुयश

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत बांदा केंद्रशाळेच्या श्रेया परब व दुर्वा नाटेकर यांचे सुयश

*ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत बांदा केंद्रशाळेच्या श्रेया परब व दुर्वा नाटेकर यांचे सुयश*

*बांदा

भारतातील नं.१ समजल्या जाणाऱ्या ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशिप परीक्षेत बांदा नं.१शाळेच्या विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे.
शाळेतील दुसरीतील विद्यार्थीनी श्रेया दत्ताराम परब हिने या परीक्षेत १००पैकी ९५गुण मिळवत सिल्व्हर मेडल प्राप्त केले तर चौथीतील विद्यार्थीनी दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने १००पैकी ७५ गुण मिळवत ब्राँझ पदक प्राप्त केले. याचबरोबर इयत्ता दुसरीतील विद्यार्थीनी शुभ्रा सागर तेली व तिसरीतील समर्थ सागर पाटील व विहान अरुण गवस हे विद्यार्थी या परीक्षेला उत्तीर्ण होऊन प्रमाणपपत्र धारक बनले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये वर्गशिक्षक जे.डी.पाटील शांताराम असनकर,रसिका मालवणकर , सपना गायकवाड, रंगनाथ परब,शुभेच्छा सावंत, मनिषा मोरे,स्नेहा घाडी, जागृती धुरी,
स्नेहा कदम , सुजाता सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत असल्याबद्दल शाळां व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिध्दये, सरपंच प्रियंका नाईक, केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा