You are currently viewing दोडामार्ग केंद्रशाळा नं.१ शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पृहा दळवी,अद्विका काळे यांनी मिळवला राज्यात येण्याचा मान

दोडामार्ग केंद्रशाळा नं.१ शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पृहा दळवी,अद्विका काळे यांनी मिळवला राज्यात येण्याचा मान

दोडामार्ग केंद्रशाळा नं.१ शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पृहा दळवी,अद्विका काळे यांनी मिळवला राज्यात येण्याचा मान

दोडामार्ग

दोडामार्ग केंद्रशाळा नं १ या शाळेतील इयत्ता पहिलीतील स्पृहा दळवी आणि अद्विका काळे या दोन्ही विद्यार्थ्यांनी या वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा,राज्यस्तरीय मंथन सामान्यज्ञान परीक्षा आणि ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा या तिन्ही परीक्षेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला वेगळा ठसा उमठवला आहे.

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता पहिलीतील स्पृहा दळवी हिने ९६ गुण घेत राज्यात तिसरी तर अद्विका काळे हिने ९४ गुण घेत राज्यात चौथी येण्याचा मान मिळवला. राज्यस्तरीय मंथन परीक्षेत अद्विका हिने ९२ गुण तर स्पृहा दळवी हिने ८८ गुण घेत या दोन्ही मुली प्रविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ब्रेन डेव्हलपमेंट (बीडीएस) परीक्षेत स्पृहा दळवी हिला १०० पैकी ९२ गुण मिळाले असून सिल्वर मेडल प्राप्त केले तर अद्विका काळे हिला १०० पैकी ८७ गुण मिळाले असून ब्राझ मेडल प्राप्त केले आहे.या दोन्ही मुलांना दोडामार्ग केंद्रशाळा नं १ या प्रशालेचे मुख्याध्यापक गावित सर शिक्षक खानोलकर सर खानोलकर मॅडम नाईक मॅडम तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही मुलांच्या या उज्वल यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून त्याचे गोडकौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा