*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. दक्षा पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सजलेले चित्रांगण*
चैत्रमास स्वागतास
सजलेले चैत्रांगण
नव उत्साहाने मग
भरे माझे मनांगण…१
चैत्र शुध्द प्रतिपदा
सण गुढी पाडव्याचा
दिन असे आनंदाचा
स्नेहभाव वर्धनाचा…२
ॠतू वसंत स्वागता
पुष्प पळसाचा रंग
लाल फुलांचा बहर
गाई कोकिळेच्या संग..३
आम्र व्रुक्षाला मोहोर
झाले सुगंधित मन
कुसुमांच्या झुंबरांनी
सुखावले द्विनयन…४
चैत्र पालवीचा बहर
नवनिर्मीतेचे क्षण
चैतन्याची उधळण आनंदाची साठवण…..५
चैत्रातले बहरणे
मोद वसे ह्रुदयात
अविष्कारास पहाता
मन होई अचंबित ….६
डाँ दक्षा पंडित
दादर, मुंबई