You are currently viewing विलवडेत हॉट मिक्सर वाहणार्‍या ट्रॅक्टरला अपघात

विलवडेत हॉट मिक्सर वाहणार्‍या ट्रॅक्टरला अपघात

विलवडेत हॉट मिक्सर वाहणार्‍या ट्रॅक्टरला अपघात

बांदा

बांदा – दाणोली मार्गावर विलवडे खांबलेश्वर मंदिर जवळ समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगत दलदलीत जाऊन ट्रॅक्टर अपघातगस्त झाला. वाहन चालक जखमी झाल्याने तो काही वेळ बेशुध्द होता. सरपंच प्रकाश दळवी व स्थानिक ग्रामस्थांनी जखमी चालकाला उपचारासाठी दवाखान्यात नेले. अपघातात ट्रॅक्टरचे किरकोळ नुकसान झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत बांदा पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी दुपारी ट्रॅक्टर चालक हा ओटवणे येथून बांदाच्या दिशेने दोडामार्ग येथे रस्त्याच्या कामासाठी ट्रॅक्टरला हॉट मिक्सर जोडून घेऊन जात होता. विलवडे खांबलेश्वर मंदिर जवळ दुसर्‍या वाहनाला बाजू देताना वाहन चालकांचा ताबा सुटून रस्त्यालगत दलदलीत ट्रॅक्टर अपघातग्रस्त झाला.

बांदा – दाणोली जिल्ह‍ामार्ग खड्डेमुक्त झाल्याने वाहन चालक सुसाट वाहने हाकतात. काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. रस्त्यावर साईड पट्ट्यांवर सफेद पट्टे मारणे, गतिरोधक असलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टर्स लावणे, आवश्यक त्या ठिकाणी रंबल्स लावणे, दिशादर्शक व चिन्हदर्शक वेग मर्यादा फलक लावावेत अशी मागणी सरपंच प्रकाश दळवी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =