You are currently viewing मांडकुली गावात शिवप्रेमी, युवा वर्ग देणार एक अनोखी भेट..

मांडकुली गावात शिवप्रेमी, युवा वर्ग देणार एक अनोखी भेट..

कुडाळ :

 

गेल्या काही दिवसांपूर्वीच होळी, शिमगोत्सवाची सांगता झाली. शिमग्यामध्ये कोकणात राधा नृत्य ही एक पारंपरिक शबय मागण्याची पद्धत आहे. मांडकुली गावातील युवा तसेच शिवप्रेमी यांचा एक संकल्प होता की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घ्यायची आहे. शिवजयंती असो किंवा गावातील कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो… गणेश पूजना सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती पूजन केली जाते. पण आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती नव्हती त्यामुळे ती इतर ठिकाणाहून आणावी लागत होती. शिवजयंतीच्या वेळेस सुद्धा महाराजांची मूर्ती उपलब्ध नसल्याने फोटोच पूजन केलं जात होतं. खरंतर शिवजयंती हा आपला सण आहे आणि तो साजरा झालाच पाहिजे अशी इच्छा प्रत्येक शिवप्रेमी शिवभक्ताची आहे, तीच इच्छा या गावातील युवा वर्गाची होती म्हणून त्यांनी एक संकल्प केला की आपण आपल्या गावासाठी एक शिवमूर्ती खरेदी करून ती तिथल्या ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊ. गावातील युवावर्ग, शिवप्रेमी एकत्र येऊन त्यांनी राधानृत्य (शबय) च्या माध्यमातूनच एक संकल्प निधी गोळा केला आणि त्याच निधीतून ते आपल्या गावासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देणार आहेत! त्यांचा हा संकल्प शबय च्या माध्यमातून पूर्ण झालेला असून येत्या मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रॅलीसहित शिवमूर्ती ग्रामपंचायत मांडकुली मध्ये सप्रेम भेट देण्यात येणार आहे. शबय च्या माध्यमातून ही एक अनोखी संकल्पना दिसून आली आणि त्याच संकल्पनेचं प्रत्येक स्तरावर कौतुक केलं जात आहे. गावातील ज्येष्ठ व्यक्ती श्री. वामन गावडे, श्रीकांत कासले, बुवा दिपक खरूडे, हरेशजी नेमळेकर, विनायक सावंत, सुमन गावडे, ज्ञानेश्वर कासले, प्रसाद वारंग यांच्यासह युवावर्ग कु. अजय कासले, अक्षय कासले, वेदांत गावडे, सुरज शेगले, मयुर नाईक, विक्रांत गावडे, आकाश कासले, महेश मोर्ये, मनीष मोर्ये, वासुदेव परब, तेजस शेगले बालकलाकार- कु गोविंद गावडे,कु प्रज्ञय नेमळेकर कु अनिरुद्ध मोर्ये,कु सोहम खरुडे आदी… सर्वच शिवप्रेमींचा या संकल्पनेला उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार आणि खुप खुप कौतुक. येत्या ९ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमास, गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची स्वागत रॅलीमध्ये गावातील सर्व बंधू-भगिनी, युवक, युवती, शिवभक्त, शिवप्रेमी आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि आनंद द्विगुणीत करावा अशी विनंती शिवप्रेमी तसेच युवावर्ग यांच्याकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा