*शाळेच्या जडणघडणीतील महत्त्वाचे घटक म्हणजे प्रकाश घाडी : राजू जठार*
*शाळेच्या कामकाजाची माहिती जाणणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश घाडी: दिलीपभाई तळेकर*
*शाळेचा चालता बोलता इतिहास म्हणजे प्रकाश घाडी : अविनाश मांजरेकर*
कणकवली :
शाळेचा महत्त्वाचा घटक व शाळेच्या महत्त्वाच्या कामकाजांची सर्व प्रकारची माहिती जाणणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश घाडी,ते वयोमानानुसार जरी सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी यापुढे ही प्रशालेला सहकार्य करावे असे प्रतिपादन माजी सभापती दिलीप भाई तळेकर यांनी केले. ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळरे येथील डाॅ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनात चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच प्रयोगशाळा परिचर प्रकाश घाडी यांच्या सेवानिवृत्ती समारंभात बोलत होते.
यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,माजी पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर,माजी व्यापारी संघटना अध्यक्ष राजू जठार,शाळा स.सदस्य शरद वांगणकर,उमेश कदम,सदस्य व व्यापारी संघटना अध्यक्ष प्रवीण वरूणकर,संतोष जठार,निलेश सोरप, माजी मुख्या. टी.बी.घोळवे,एस.आर.घुगरे, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर,शशांक तळेकर,ग्रामस्थ उदयनाना तळेकर,ग्रामपंचायत सदस्य संदीप घाडी,तळेरे गावठण नाट्यमंडळ अध्यक्ष आप्पा मेस्त्री, प्रकाश घाडी यांचे सर्व कुटुंबीय, व्याही,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद ,ग्रामस्थ,पालक व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रकाश घाडी यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांच्यातर्फे शाल,श्रीफळ,सुवर्ण अंगठी,भेटवस्तू तसेच संस्थेतर्फे मानपत्र प्रदान करण्यात आले. माजी मुख्या.एस.जी.घुगरे,राजू जठार,पालक,माजी विद्यार्थी कुटुंबीय,जावई या सर्वांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देण्यात आल्या.प्राध्यापिका ए.बी.कानकेकर यांच्या हस्ते प्रकाश घाडी यांच्या आईचा शाल ,श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
कर्माचे फळ नेहमीच सुमधुर असते असे प्रतिपादन सूर्यकांत तळेकर यांनी केले. शाळेच्या जडणघडणी मधील महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रकाश घाडी असे मनोगत राजू जठार यांनी व्यक्त केले,प्राचार्य अविनाश मांजरेकर म्हणाले की प्रशालेचा चालता बोलता इतिहास म्हणजे प्रकाश घाडी,यानंतर चंद्रकांत तळेकर,शशांक तळेकर,प्रवीण वरूणकर,शरद वांगणकर, एस.आर. घुगरे,टी.बी.घोळवे,ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे,डी.सी.तळेकर, विद्यार्थी तेजस जंगले यांनीही आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका एस.यु.सुर्वे तर आभार प्राध्यापक सचिन शेटये यांनी मानले.
नुकतेच कामाठी नागपूर येथे 50 दिवसीय प्रशिक्षण संपवून *एन.सी.सी.थर्ड ऑफिसर म्हणून रँक व स्टार* प्राप्त केल्याबद्दल प्रशालेमार्फत एन.बी.तडवी यांचा तसेच नारीशक्ती दौड स्पर्धे अंतर्गत डी.सी.तळेकर व एस.एन.जाधव यांचा प्रमाणपत्र देत आणि रांगोळी स्पर्धेत क्रमांक मिळवलेले विद्यार्थी यांचाही यावेळी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.