वैभववाडी:
आखवणे भोम प्रिमियर लिग २०२४ आयोजित मर्यादित षटकाच्या टेनिस बाॕल स्पर्धेत स्टार गांगो इलेव्हन या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तक्षित इलेव्हन संघाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर राघोबा इलेव्हन संघाने तिसरा क्रमांक मिळवला आहे. विजेत्या संघाला अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
आखवणे भोम प्रिमियर लिग २०२४ क्रीकेट स्पर्धा आखवणे गुरववाडी येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. या स्पर्धेसाठी आखवणे, भोम येथील तरुण मोठ्या संख्येने मुंबईवरुन आले होते. अरुणा धरणामुळे आखवणे व भोम गावचे विस्थापन झाले आहे. त्यामुळे दोन्हीही गावे विखुरली गेली आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने दोन्हीही गावातील तरुण मुलांना एकञ येण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत चौथा क्रमांक स्टार इलेव्हन संघाने पटकावला. त्याला ३ हजार रुपये चषक देऊन गौरविण्यात आले.
तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत मालिकावीर इंद्रजित समई, बेस्ट बॅटस्मन – गौरव कांबळे, बेस्ट बॉलर- रमेश गुरव, बेस्ट क्षेत्ररक्षक – मयूर जाधव यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्या आले. यावेळी आखवणे पोलिस पाटील संतोष गुरव, तंटामूक्त समिती अध्यक्ष विकास जामदार, नवनाथ गुरव, अंकुश नागप, अभय कांबळे, शैलेश पांचाळ, महेश कदम, महादेव नागप, यांच्यास मोठ्या संख्येने आखवणे भोम येथील ग्रामस्थ उपस्थित होते.