You are currently viewing नावे का ठेवू? नामस्मरणात जगू !

नावे का ठेवू? नामस्मरणात जगू !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा.सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नावे का ठेवू? नामस्मरणात जगू !*

 

आपल्या डोळ्यातील मुसळ नाही दिसत

दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळही दिसतं |

आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा

या मार्गात परभवाचंच घर मिळतं ||१||

आभाळमाया अन् यश शिखर यांच्यात

एक ममता ऋणानुबंध खास असतो |

राहता आभाळमायेने सर्वोच्च दृष्टीत

पुढे मागे कोण कसे हा विवेक नसतो ||२||

स्पर्धा असो वा संसारखेळ जीव सुखाचा

प्रामाणिकता शेवटपर्यंत राखायची |

दुसऱ्याच्या सौभाग्य चिंतनी आहे माणसा

ही सकारात्मक सवय सुखी जगायची ||३||

मार्ग सुलभ कल्याणकारी असेल ठावे

रुचेल त्यासी खात्रीने मग त्यावरी न्यावे |

खच्चीकरण कुणाचेही कधी न करावे

सदा सर्वोत्तम मानवा सकलांचे व्हावे ||४||

नावे कुणा का ठेवावी प्रत्येकानं जगावं

जो जे वांच्छील तो ते लाभो प्राणिजात |

नावं ठेवण्यापेक्षा नामस्मरणी जगावं

जगू द्या मनासारखे सुखाने प्राणिजात ||५||

 

कवी :– श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला,

जि. :- सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा