You are currently viewing अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी :

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी रंगदेवता नटेश्वर नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ रंगकर्मीं डॉ. श्री. शशांक पाटील,वामन जोग,सत्कारमूर्ती श्री.श्रीकांत पाटील श्री. सुहास साळवी , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरीचे कार्याध्यक्ष श्री समिर इंदुलकर कोषाध्यक्ष श्री सतीश दळी, सदस्य श्री वामन कदम ,सनातन रेडीज, संजय वैशंपायन ,अनिल दांडेकर, श्रीमती आसवरीताई शेट्ये, सौ.सुनीता बाम, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात या वर्षी संपन्न झालेल्या गद्य राज्य नाट्य स्पर्धेत बक्षीस विजेत्या संगीत नाट्य स्पर्धेतील बक्षीस विजेत्या, एस टी कामगारांच्या स्पर्धेतील विजेत्या युवा महोत्सवातील पदक विजेत्या आणि इतरही उल्लेखनीय रंगकार्य करणाऱ्या सर्वच वयोगटातील जवळ जवळ चाळीस रंगकर्मिचं कौतुक अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्या वतीनं करण्यात आलं. जेणेकरून या सर्वच रंगकर्मींचे मनोबल उंचावेल आणि त्यांची अधिकाधिक प्रगती साधली जाईल. दोन्ही सत्कार मूर्तींचा सत्कार अनुक्रमे श्री सुहासजी साळवी यांचा सन्मान शशांक पाटील सर यांच्या हस्ते आणि श्रीकांत पाटील सर यांचा सन्मान ज्येष्ठ रंगकर्मीं श्री वामनराव जोग यांच्या हस्ते करण्यात आला.

सन्मानास उत्तर म्हणून ४५ वर्षांची रंगकरकिर्द आठवून दोन्ही सत्कारमूर्तीनी शाखेबद्दल ऋणानुबंध उलगडून दाखविले. या प्रसंगी श्री सचिन लांजेकर, कुमारी स्मार्था गवाणकर आणि कुमारी टोपो, विजय पोकळे यांनी गीत गायन सादर केले. तर कुमारी आदिती सावंत आणि सौ गोगटे यांनी खूपच सुंदर अभिवाचंनही सादर केले, सोहम कदम आणि श्री वामनराव जोग यांनी एकपात्री अभिनय सादर केला. वामनराव जोग यांच्या नटसम्राट नाटकातील स्वागतानं उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले आणि उपस्थित युवक युवतींना अभिनयाची तयारी कशी असावी याचा एक वस्तुपाठच घडवून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय धोपटकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचं सर्व कार्यकारिणी सदस्य सुनील बेडखळे, राकेश बेर्डे, संतोष सनगरे, आनंद आंबेकरसनातन रेडीज, सतिश दळी, दादा कदम, विजय पोकळे, संजय वैशंपायन, अनिल दांडेकर, राजन गोगटे, नंदू भारती यांनी मोलाचे कार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − six =