ग्राहक चळवळीचा धागा हो..”
रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न….
आज २४डिसेंबर.. राष्ट्रीय ग्राहकदिन.१९८६ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांनी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन आणि ग्राहकांची फसवणूक होता नये या उद्देशाने ग्राहक संरक्षण कायदा भारताच्या संसदेत संमत केला.या कायद्यातील तरतुदी आणि वेळोवळी परिस्थितीनुसार गरज लक्षात घेऊन केलेल्या सुधारणा पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल कि ग्राहक हा राजा आहे(.CONSUMER IS A KING)हे या कायद्याने अधोरेखित केलेल आहे…मात्र जर ग्राहकच आपल्या या कायद्याने दिलेल्या अधिकाराबाबत सजग नसेल तर कायद्यात कितीही कठोर उपाययोजना केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. ग्राहकाची फसवणूक झाली किंवा ग्राहकाने योग्य मोबदला देवूनही प्रत्यक्षात योग्य सेवा मिळाली नाही तर त्याबत कायदेशीर दाद मागण्यांसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक संरक्षण फोरमची रचना कार्यरत आहे.तसेच प्रत्येक जिल्हा स्तरावर सर्व सेवा देणाऱ्या शासकीय व निमशासकीय आस्थापनाचे अधिकारी, सामाजिक व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काम करणारे अशासकीय सदस्य यांची शासनाच्या आदेशानुसार ग्राहक संरक्षण परिषद स्थापन केलेली असून त्याचे पदसिद्ध अध्यक्ष हे जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी असतात तर सचीव जिल्हा पुरवठा अधिकारी असतात.
आज राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब सावंतवाडीने ग्राहकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्गचे अशासकीय सदस्य व अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड नकुल पार्सेकर यांनी ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याद्वारे ग्राहकांना मिळालेले कायदेशीर अधिकार याबाबत सविस्तर माहिती दिली.ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ यांनी आँनलाईन खरेदी करताना विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन केले.हा जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरिचे सचीव रोटरियन श्री म्हापसेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.