*भाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड*
*आमदार नितेशजी राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान*
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विविध मोर्चा / आघाड्यांच्या बैठका आयोजित करुन निवडणुकीत कशा पद्धतीत प्रचाराची यंत्रणा उभी करायला पाहिजे , याबाबत मार्गदर्शन करत आहेत .
अशाच पद्धतीत भाजपा कामगार मोर्चाची बैठक जिल्हा संयोजक अशोक राणे यांनी आयोजित केली होती . सर्वप्रथम कामगार मोर्चाच्या जिल्हा कार्यकारणीची रचना तयार करुन , विधानसभा निहाय बैठका घेऊन प्रचार कमिटी तयार करणार असल्याचे सांगीतले . तसेच मोदी सरकार ने असंघटित कामगारांसाठी केलेल्या विविध योजनांच्या लाभार्थीपर्यंत पोहोचून , पुन्हा एकदा मोदी सरकार येण्यासाठी ह्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले .
यावेळी कणकवली विधानसभा कामगार मोर्चा संयोजक पदी संतोष तेली यांची निवड करुन आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले .यावेळी मार्गदर्शन करताना आम.नितेशजी राणे म्हणाले की विकसित भारताच्या आकांक्षा पुर्ण करण्यात श्रमशक्तीचा मोठा वाटा आहे . यासंकल्पनेतुन नव्या भारतात कामगार आणि कष्टकऱ्यांचा आदर करण्याची संस्कृती उदयास येत आहे .देशाला आता आपल्या श्रमशक्तीचा अभिमान आहे . कष्टाचा आदर आणि कष्टकऱ्यांचा सन्मान करण्याचे काम मोदी सरकार ने केले. पंडित दीनदयाळ ” श्रमेव जयते ” च्या माध्यमातून मोदी सरकारने कामगारांचे सक्षमीकरण करुन त्यांच्या संरक्षणाची हमी घेतली . त्यामुळेच पुन्हा एकदा मोदी सरकार येण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे , असे आवाहन केले .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व मुख्यालय प्रभारी प्रसंन्ना देसाई , कामगार मोर्चा सावंतवाडी विधानसभा संयोजक सत्यम सावंत , देवगड मंडल संयोजक प्रकाश विष्णु सावंत , सावंतवाडी संयोजक विनोद सावंत , देवगड भाजपा अध्यक्ष संतोष किंजवडेकर , जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे , अक्षय दळवी इत्यादी उपस्थित होते .
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*