You are currently viewing पाणी वाचवा संदेशासाठी ३०० किलोमीटरचा सायकल प्रवास…

पाणी वाचवा संदेशासाठी ३०० किलोमीटरचा सायकल प्रवास…

पाणी वाचवा संदेशासाठी ३०० किलोमीटरचा सायकल प्रवास…

कणकवलीतील दीपक शिंदेची जनजागृती; कनक रायडर सायकल क्लबने केले अभिनंदन…

कणकवली

जगातील बहुतांशी देशांमध्ये पाणीटंचाई समस्या आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करून पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. पाण्याचे महत्व सर्वांना कळावे या उद्देशाने कणकवलीतील दीपक शिंदे याने कणकवली ते मडगाव असा ३०० किमीचा सायकलद्वारे प्रवास करून पाणी वाचवा हा संदेश दिला.

दीपक शिंदे याचे फिल्टर सर्व्हिस सेंटर आहे. ग्राहकांच्या घरभेटी दरम्यान नेहमीच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे त्यांना वारंवार दिसून आले. त्यातूनच पाणी वाचवण्याबाबत त्याला जगजागृती करण्याची संकल्पना सुचली. या संकल्पेतून कणकवली ते मडगाव ३०० किमीचा सायकलाद्वारे प्रवास करून पाणी वाचवण्याचा संदेश दिला. ही सायकलस्वारी करून दीपक शिंदे कणकवली दाखल झाले. त्यावेळी त्यांचे कनक रायडर सायकल क्लबच्या वतीने त्यांचे अभिनंदन करीत पाणी वाचवा या संकल्पेचे कौतूक केले. यावेळी प्रा.योगेश महाडिक, संजय कदम,संजय बिडये,कैलास सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा