You are currently viewing काय उरतंय आयुष्यात

काय उरतंय आयुष्यात

*काय उरतंय आयुष्यात*

वाटलं पहावं एकदा,
तुझ्यापासून दूर राहून.
आठवणी ह्या रोजच्याच,
बघावं त्यांनाही विसरून.
मग शोधावं…
काय उरतंय आयुष्यात…..
तू सोडून?

कामात गुंतून घ्यावं,
अगदी देहभान विसरून.
विचारांनाही दूर सारावं,
ठामपणे मनाशी ठरवून.
मग शोधावं…
काय उरतंय आयुष्यात…
तू सोडून?

विचारांच्या वादळांना,
उसळत किनाऱ्यावर आणून,
धडकू द्यावं हृदयावर,
अंतर्मन शांत ठेवून.
मग शोधावं…
काय उरतंय आयुष्यात..
तू सोडून?

जीवन प्रवास सुरु होतो,
प्रेमाच्या आणाभाका घेऊन.
भरकटलेली नाव प्रेमाची,
जाते वाऱ्याच्या दिशेने वाहून..
मग शोधावं…
काय उरतंय आयुष्यात…
तू सोडून.

सर्वकाही गेलं तरी आयुष्य,
थांबत नाही कोणावाचून.
सोबत असते ती एकटीच,
स्वतःच आपली सावली बनून.
म्हणून शोधावं..
काय उरतंय आयुष्यात…
ती सोडून..?

(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा