ग्रामविकास ही संकल्पना आता दिवसेंदिवस वेगाने द्रूढ होत असताना गावातील काही अविवेकी शक्तीमुळे वादविवाद, भ़ाडणतंटे, गटतट, पक्षीय श्रेयवाद यामुळे गावाचा विकास खुंटतो.विविध माध्यमातून आलेल्या विकास कांमाचा निधीही परत जातो. सत्तेच्या आणि अहंकाराच्या राजकारणात अनेकदा गावाला मुलभूत सुविधापासून वंचित रहावं लागत. त्यातही एखादा “मुखिया”हा अर्धवट आणि ऐकीव माहितीच्या आधारे जर निर्णय घेत असेल तर आणखीन समस्या वाढतात.
नेमके याचं सगळ्या नकारात्मक गोष्टींना छेद देवून गेली काही वर्षे दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावाचे सरपंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र श्री प्रवीण परब..जात, धर्म, पंथ, पक्ष आणि गावातील गटतट यांना तिलांजली देवूच गावातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन रचनात्मक आणि नियोजनबद्ध केलेल्या कामाची दखल शासन स्तरावर घेतली गेली आणि आदर्श ग्रामपंचायतीचे पहिल्या क्रमांकाचे दहा लाखाचे पारितोषिक प्राप्त झाले.
मी गेली दहा वर्षे श्री प्रवीण परब यानां जवळून ओळखतो..प्रत्येक भेटीत शासनाच्या नवनवीन योजना, त्याचे लाभार्थी आणि त्याबाबतचे अभ्यासपूर्ण प्रस्ताव यावरच त्या़ची चर्चा असते.सतत गाव विकासासाठी सकारात्मक उर्जा घेऊन काम करणारा हे आमचे मित्र इतर अनेक सेवाभावी काम करत असतात.. त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेला कुणीही माणूस रिकाम्या हातानी कधीच येत नाही.. आपल्या क्षमतेनुसार मदतीचा हात देणे हा त्यांचा स्वभावधर्म..
अर्थात समाजासाठी समर्पित भावनेनं काम करणाऱ्यांच्या मार्गात काटे पसरवणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही… तरीही टोचलेल्या काट्यांची भळभळती जखम घेऊन गाव विकासासाठी झटणाऱ्या या आमच्या मित्राचे अर्थात कुब्रलच्या पोपटराव पवारांचे अटल आणि स्नेहप्रिया परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन!
…अँड.नकुल पार्सेकर..