You are currently viewing कौतुक तरी किती करावं…!!

कौतुक तरी किती करावं…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कौतुक तरी किती करावं…!!*

ओंथबलेल्या काळ्या ढगांना
मावळत्या किरणांचं कौतुक
सोसाट्याच्या मुक्या वादळाला
मंद झुळुकेचं कौतुक…

धुवाधार वेड्या पावसाला
डोळ्यांतील अश्रूचं कौतुक
युगासम प्रचंड वटवृक्षाला
इवल्याशा रोपट्याचं कौतुक

धगधगणा-या संतप्त सुर्याला
चमकणा-या काजव्याचं कौतुक
कोसळणा-या व्याकुळ धबधब्याला
खुळ्या दवबिंदूचं कौतुक

ईश्वरी निसर्ग देवतेला
चिरतरुण महाभूताचं कौतुक
निराकारी आत्मरूपी परब्रम्हाला
निर्गुणी सावलीचं कौतुक..!!

बाबा ठाकूर धन्यवाद

*संवाद मीडिया*

*त्वरा करा…त्वरा करा…त्वरा करा…*

*मालवण व मुंबईमधील एकमेव पब्लिकेशन..*

*सुहासिनी प्रकाशनाची आगामी पुस्तके*

*🔹धुमी* (कादंबरी) रू.200/-
*🔸 मुक्काम मालवण – भरड नाका* (आत्मकथन) – रू. 300/-
*🔹श्रावणसरी* (कथासंग्रह) रू. 200/
*🔸 सांदी – कोपरा* (ललित संग्रह) रु.200/-

*लेखक – चंद्रकांत पारकर.*

*🔹आठवणीतले नामवंत* (लेखसंग्रह) (रु. 500/-)
*श्री. रवींद्र वराडकर*

*वरील पुस्तके गणपती सणापूर्वी प्रकाशित होत आहेत.*

*प्रकाशित होण्यापूर्वी खरेदी केल्यास 50% सवलत*

*▪️सुहासिनी प्रकाशन*▪️

*राजगड बिल्डिंग, करीरोड (प.) मुंबई-400013*

*📲संपर्क – 9821427752 / 7558757752*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/130316/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 7 =