You are currently viewing अंशकालीन स्त्री परिचर प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित

अंशकालीन स्त्री परिचर प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित

अंशकालीन स्त्री परिचर प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित

ओरोस – प्रतिनिधी :-

कोविड काळात काम करत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांना प्रोत्साहन भत्ता देण्यात काही ग्रामपंचायतींकडून वेळकाढूनपणाचे धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव राजवी यादव यांनी केला आहे. दोन महिने उलटले तरीही काही ठिकाणी भत्ता देण्यात आलेला नाही. ५ सप्टेंबरपर्यंत प्रोत्साहन भत्ता बँक खात्यात जमा न केल्यास येणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून १०० टक्के पूर्तता होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या घंटानाद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती रावजी यादव यांनी दिली.

कोविड काळात काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका इत्यादी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण आणि प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला होता. मात्र या कामात असलेल्या अंशकालीन स्त्री परिचर यांना यातून वगळण्यात आले होते. याबाबत ४ मे रोजी स्त्री परिचरांनी यादव यांच्या नेतृत्वाखाली उपकेंद्रासमोर कुटुंबीयांसह घंटानाद करून ही सुविधा केली होती.

त्यानंतर शासनाने अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांसह कंत्राटी वाहन चालकांनाही ५० लाखांचे विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता देण्याचे मान्य केले होते. प्रोत्साहन भत्तापोटी १ हजार रुपये देण्याचे आदेश होऊन दोन महिने झाले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी हा प्रोत्साहन भत्ता अंशकालीन स्त्री परिचरांना दिलेला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा