You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

 

*(श्री गजानन विजय ग्रंथ)*

अध्याय आठवा

 

भाऊ हरि पाटलांचा

खंडू पाटील धाकला

कागदाचा टप्पा द्याया

म-याकडे असे गेला ||

 

टप्पा मी न देणार

म-या वदे पाटलाला

हुकुमाला शिमग्याच्या

बोंबा वाटतात मला ||

 

काठी प्रहार खंडूने

केला म-या हातावर

हात मोडला तत्क्षणी

आला आळ खंडूवर ||

 

एका जातीचे असून

नुकसान स्वार्थासाठी

चूक आहे हे सर्वथा

जाण ठेवा हितासाठी ||

 

बेड्या पडणार करी

ऐकताच घाबरला

आला श्रींकडे धांवत

मार्ग काही दावा मला ||

 

संकटाचे निरसन

केले असे समर्थांनी

जीत सत्याचीच होते

ध्यानी ठेवावे सर्वांनी ||

 

कृष्णाजीच्या मळ्यामध्ये

“श्रींचा” होता हो मुक्काम

आला ब्रह्मगिरी साधु

गोष्ट घडे अनुपम ||

 

साधु असे हा दांभिक

लेश न स्वानुभवाचा

नैनं छिन्दन्ती श्लोकाचा

खेळ हा शब्दच्छलाचा ||

 

“जळणा-या पलंगी श्री”

आरामात बसलेले

भास्कराने गोसाव्यास

उभे” श्रीं” पुढे हो केले ||

 

खरे करा श्लोक वाक्य

आज्ञा केली समर्थांनी

पोटभ-या साधु हो मी

माफी मागे”श्री” चरणी ||

 

बोध केला समर्थांनी

ब्रह्मगिरी गोसाव्याला

निरर्थक कथनाने

हानी होते संस्कृतीला ||

 

संस्कृतीला जपा सदा

जाणा मोल या बोधाचे

नाद सोडा दांभिकांचा

हित साधा समाजाचे ||

 

©️®️

सौ.मंजिरी अनसिंगकर,

नागपूर

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*ऑनलाईन बुद्धिबळ ट्रेनिंग*

 

*सविस्तर वाचा 👇*

——————————————

 

*ऑनलाईन बुद्धिबळ ट्रेनिंग*

♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️

 

👉 रोज रात्री – 8.00 ते 8.30 वाजता

 

👉 ट्रेनिंग फी (monthly 20 session) 500/- advance

Gpay/phonepay only 9422381949

♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️

 

👉 प्रशिक्षण विषय – बुद्धिबळ बेसिक माहीती (नवीन खेळाडूसाठी), बुद्धिबळ खेळातील मध्य खेळात वापरल्या जाणाऱ्या युक्ती व tactics व त्यावर सराव तसेच बुद्धिबळ ला अनुसरून ईतर मार्गदर्शन

 

👉 मुलांचे सोयीनुसार बँच करून ट्रेनिंग दिले जाईल

 

👉 सुचना – फी gpay केल्यानंतर पेमेंट स्क्रीन शेअर करा (पेमेंट कन्फर्म झाले वर मुख्य प्रशिक्षण ग्रुप मध्ये समावेश केला जाईल)

 

👉 बुद्धिबळ ट्रेनिंगचा डेमो करिता खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://chat.whatsapp.com/Cvc7dTlpki9DWp6z0f5OB8

 

🏁🏁🏁🏁🏁🏁🏁🏁

🎴 *श्री चेस अकॅडमी कणकवली*

श्रीकृष्ण आडेलकर

9422381949 / 9405928919

 

♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा