You are currently viewing आनंदव्हाळ येथे बसच्या धडकेत रिक्षा पलटी

आनंदव्हाळ येथे बसच्या धडकेत रिक्षा पलटी

आनंदव्हाळ येथे बसच्या धडकेत रिक्षा पलटी

मालवण

बसच्या डिकीचा उघडा दरवाजा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाला अडकल्याने रिक्षा फरफटत पुढे जात पलटी झाली. रिक्षाच्या बाजूला उभे असलेले रिक्षामालक पराग राधाकृष्ण शेलटकर रा. कोळंब खालचावाडा हे या अपघातात सुदैवाने बचावले. 27 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल मुख्य मार्गांवरील आनंदव्हाळ येथे हा अपघात घडला. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

कोळंब खालचा वाडा येथील पराग राधाकृष्ण शेलटकर हे आपली रिक्षा एमएच 03 सीटी 3864 ही घेऊन एका प्रवाश्या सोबत 11 वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथे आले होते. त्याठिकाणी असलेले काही साहित्य घेऊन ते पुन्हा कोळंब येथे निघणार होते. त्यामुळे गाडी मालवणच्या दिशेने वळवून रस्ता सोडून खाली मातीत त्यांनी गाडी उभी केली. गाडीतील प्रवासी त्याठिकाणी असलेले साहित्य गाडीत आणत होते. तर पराग शेलटकर हे गाडीच्या मागे उभे होते. याच वेळी मालवणच्या दिशेने येत असलेल्या बसच्या दरवाजा बाजूच्या डिकीचा उघडलेला दरवाजा रिक्षाला धडकला व रिक्षा पलटी झाली.

यावेळी पराग शेलटकर हे रिक्षेच्या बाजूलाच उभे होते. प्रसंगावधान राखत ते बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. पराग यांचा आज वाढदिवस होता. त्या दिवशीच हे संकट त्यांच्यावर कोसळले. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बसच्या डिकीचा दरवाजा उघडला याबाबत बसच्या मागून येणाऱ्या दुचाकी चालकांनी हॉर्न वाजवून दरवाजा उघडा असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दरम्यान अपघात घडला.

या घटनेची माहिती मिळताच मार्गांवर असलेले जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे महेंद्र देउलकर, संप्रसा सावंत, अविनाश गायतोंडे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेत वाहतूक सुरळीत केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, धोंडी जानकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. पुढील कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. बस प्रशासन अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते. रिक्षाचे झालेल्या नुकसानाची भरपाई करून देण्याबाबत चर्चा सूरू होती. अशी माहिती देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा