You are currently viewing व्हेंटिलेटर रूग्णवाहीकेची तातडीनं सोय करा ; देव्या सुर्याजी यांची सीएसकडे मागणी

व्हेंटिलेटर रूग्णवाहीकेची तातडीनं सोय करा ; देव्या सुर्याजी यांची सीएसकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्स अभावी अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत. याबाबत युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने आवाज उठविला होता. जिल्ह्यात केवळ तीन व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्स असल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्ससाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांच्याकडे युवा रक्तदाता संघटना सावंतवाडीच्यावतीने करण्यात आली. तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला देखील हि १०८ (ALS) ॲम्ब्युलन्स तातडीने द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तालुक्यात अनेक गावं असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सिरीयस रुग्णांना गोवा-बांबोळी रुग्णालयवर अवलंबून राहावे लागत आहे. अशावेळी ब-याच रुग्णांचे ॲम्ब्युलन्स अभावी प्राण जात आहेत. सावंतवाडी तालुक्याला व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्ससाठी ओरोसच्या १०८ ची वाट पाहत राहावी लागते. त्यावेळेत रुग्ण दगावत आहेत. त्यासाठी तातडीने (ALS) ॲम्ब्युलन्स देण्यात यावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केली. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांची भेट घेत याबाबतच पत्र देण्यात आले. यावेळी देव्या सूर्याजी, मंगेश तळवणेकर, अर्चित पोकळे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा