You are currently viewing स्मार्ट  फोनच्या चार्जिंगचा ‌स्फोट झाल्याने चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू

स्मार्ट  फोनच्या चार्जिंगचा ‌स्फोट झाल्याने चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू

चार्जिंग सुरू असताना मोबाईलचा स्फोट! चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू

स्मार्ट  फोनच्या चार्जिंगचा ‌स्फोट झाल्याने चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या स्फोटात संपूर्ण कुटुंब होरपळल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे घडली.

स्मार्टफोनला घरात चार्जिंगला लावले होते. परंतु मुले मोबाईलवर गेम खेळत होती. यावेळी अचानक स्फोट झाल्याने घराला आग लागली. यात कुटुंबातील सहा जण गंभीररीत्या होरपळले. ऐन होळीत ही दुर्दैवी घटना घडली. यात चार छोटय़ा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जॉनी हे मजूर म्हणून काम करतात. होळीमुळे ते घरीच होते. पत्नी बबीता या स्वयंपाक करत होत्या. मुलगी सारिका (10), निहारिका (8), मुलगा गोलू (6), कालू (5) हे घरात होते. फोन चार्ंजगला लावला असताना मुले त्यावर गेम खेळत होती. त्यामुळे विजेच्या बोर्डवक चार्जर मध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. ठिणगी बेडवर अंथरलेल्या पह्मच्या गादीवर पडली. यामुळे घराला आग लागली. बबीता, सारिका आणि जॉनी यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हे सर्व जण भाजले. या आगीत होरपळलेल्या आई-वडिलांची स्थिती गंभीर आहे.

शेजारी मदतीला धावले…

जॉन यांच्या घराला आग लागली. किंकाळण्याचा आवाज ऐकल्यानंतर शेजारी मदतीला धावले. शेजायांनी सर्वांना घराबाहेर काढले. पाणी टाकून आग विझवली. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु,

उपचारादरम्यान निहारिका आणि कालू या दोघांचे निधन झाले. दुसऱया दिवशी अन्य दोन मुलांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.

या टिप्स फॉलो करा

– फोन चार्जिंगला असताना पह्नवर बोलू नये.
– पह्नला ओव्हरलोडिंग चार्जिंग करणे टाळावे.
– फोनची बॅटरी वारंवार चार्ज करू नये.
– फोन चार्जिंग वेळी बनावट चार्जर वापरू नये.
– स्मार्टफोनला रात्रभर चार्जिंग करू नये.
– चार्जिंग वेळी फोनवर गेम खेळणे टाळावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा