ओरोस :
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन २०२३ – २५ मध्ये जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धेत ओरोस बुद्रुक शाळा नं १ च्या विद्यार्थीनींनी प्रथम क्रमांक प्राप्त करून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. अतिशय मानाच्या समजल्या जाणार्या या स्पर्धेत इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यात लावण्या घाडीगावकर, रक्षा बांबूळकर, टीना ओरसकर, लाजरी पालव, गोजिरी घाडीगावकर, यश्वि राऊत, संचिता तावडे, निशा गुरव, दीक्षा घाडीगावकर, कार्तिकी परब, उत्कर्षा सूर्यवंशी, मान्यता माड्ये या विद्यार्थीनी सहभागी होत्या. त्यांना शाळेतील शिक्षिका रिया आळवेकर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. स्मिता गवस, श्रीम. संगीता सावंत, श्रीम. गीता सावंत, श्रीम. संगीता पाट्येकर, श्रीम. माधवी सावंत, श्रीम. तेजस्विनी सावंत, श्रीम. मनाली कुडाळकर यां सर्व शिक्षिकांचेही मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. सिंधुदुर्ग मा. श्री. गणपती कमलकर, कुडाळ तालुका गटशिक्षणाधिकारी मा.श्री. संदेश किंजवडेकर, हुमरमळा प्रभाग विस्तार अधिकारी मा. विनायक पाटील, हुमरमळा केंद्रप्रमुख छोटुराम पवार, श्रीम. स्मिता गवस, शा. व्य. स. अध्यक्ष श्री नागेश ओरोसकर तसेच उपाध्यक्ष व सर्व सदस्य पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थिनींचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.