बागवे हायस्कूल मसुरे येथे इकोफ्रेंडली होळी.
मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आर. पी. बागवे हायस्कूल व एम. जी. बागवे तांत्रिक विद्यालय, मसुरेच्या विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळीचा आनंद घेतला. होळी या सणाचे औचित्य साधून त्या निमित्ताने खेळण्यात येणारी रंगपंचमी पर्यावरणपुरक रंगांनी साजरी करण्याबाबत प्रशालेतील हरितसेना शिक्षक श्री आर. एल. पाताडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
पाने,फुले, फळे व निसर्गातील विविध घटक वापरून रंग तयार करण्याबाबत माहिती दिली. मुलांनी निसर्गातील विविध घटक वापरून रंग बनविले. यावेळी प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका जाधव मॅडम , भोगले मॅडम, भरत ठाकूर, शशांक पिंगुळकर, हळवे सर, समीर नाईक , घाटे सर उपस्थित होते.