You are currently viewing शाळा सुटली .. पाटी फुटली..!

शाळा सुटली .. पाटी फुटली..!

*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे सन्मा सदस्य कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शाळा सुटली .. पाटी फुटली !*

——————————-

कान धरून केस

माय न्हानीत मारून

बसवायची अघोळीला

कश्याचे साबन उटणे

रगडे माय वजरी पाठीला

 

मान धरून पक्की

केस ईचरायची आडवे

बकोट धरून कुर्ता

मी तोंड करी तिडवे

 

खताची थैली शिवून

झाले तयार दप्तर माझे

पाठी नव्हते तेव्हा

आता सारखे ओझे

 

घेवून निघे मी शाळेत

खोचून आंगडे पोटी

कसले पुस्तक पेन

दगडी लेखन फुटकी खापरी पाटी

 

चढढी सरके खाली

करदुडा काडीने पिळून

ढुंगण दिसे फाटकी चढ्ढी

तरी कुणी ना पाहे वळून

 

नाकातून लोंबे कधी

खालीवर होई लोळ्या

कुणी ओढे माझी शेंडी

कुणी म्हणे शंकर पाळ्या

 

शाळेत कारनामे किती

रोजच धिंगा मारामारी

कधी शाळेला दांडी

राणात भटकंती फेरी

 

मज आठवते अजूनी

बोरे चिंचा कवड्या

मला आठवतो रघ्या भावड्या

 

ज्वारी भाजूनी कणसे

तडतड फुटती लाह्या

हरबरे भाजता जळती

जळून जाई वाया

 

कधी आठवतो घर

गळणारा पावसाळा

मज दिसते अजूनही

गावाकडची कौलारू शाळा . ‘

 

दिवस आज कसे

बदलत काळ गेले

किती आठवणी जाग्या

किती क्षण वाहून गेले .

✍🏽

मनोहर पवार . केळवदकर .

9850812651.

प्रतिक्रिया व्यक्त करा