“अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स”आयटी प्रोजेक्टचा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात शुभारंभ
सावंतवाडी
‘अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स ‘च्या माध्यमातून अन्नपूर्णा कोरगावकर व संतोष कानसे यांनी एकत्रित येत या जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण पाऊल टाकलं आहे.
माजगाव उद्यमनगर सुरू करण्यात आलेल्या येथे ‘अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स’ या आयटी स्टार्टअपच्या पायलट प्रोजेक्टचे ‘ग्रँड ओपनिंग’ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, श्रीरंग मंजुनाथ आचार्य ( हळदीपूर ), भिकाजी देऊ कानसे, माजी नगरसेविका ॲड. पुष्पलता कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये टॅलेंट आहे.
उच्च विद्य विभूषित झालेली येथील अनेक मुले आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी पुणे मुंबई सारख्या शहरात तसेच देश-विदेशातील अनेक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी जातात. माजगाव येथे सुरू झालेल्या या प्रोजेक्टमुळे येथील मुलांना याच ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच त्यांनी उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
यावेळी अन्नपूर्णा टेक सोर्सच्या सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर, गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे, प्रोप्रायटर ऐश्वर्या कोरगांवकर, सौ.अन्नपूर्णा कोरगावकर यांचे वडील श्रीरंग मंजुनाथ आचार्य ( हळदीपूर ), गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे यांचे वडील भिकाजी कानसे, सावंतवाडीच्या माजी नगरसेविका ॲड. पुष्पलता कोरगावकर, दत्तप्रसाद कोरगांवकर, व्यंकटेश शेठ, अखिलेश कोरगांवकर आदी उपस्थित होते.
तसेच ह्या नवीन प्रोजेक्ट ला माजी नगराध्यक्षा श्वेता शिरोडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत, अजय सावंत, आर्किटेक्ट अमित कामत, ओंकार कलवडे, प्रा. विकास गोवेकर, उद्योजक श्रीकृष्ण काणेकर, रमेश भाट, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत कोरगावकर व कानसे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
संवाद मीडिया*
*📣प्रवेश सुरु….📣प्रवेश सुरु….📣 प्रवेश सुरु….📣*🏃🏃♀️
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे….*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
*एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न*
*BCA*
*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*
*बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स*👩🎓🧑🎓
*2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी, कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो*
*अधिक माहितीसाठी…👇*
*📲7972997567*
*📲9420274119*
*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/130318/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*