You are currently viewing उभादांडा येथील श्री गणेशाच्या मूर्तीचा विसर्जन सोहळा उत्साहात…

उभादांडा येथील श्री गणेशाच्या मूर्तीचा विसर्जन सोहळा उत्साहात…

उभादांडा येथील श्री गणेशाच्या मूर्तीचा विसर्जन सोहळा उत्साहात…

वेंगुर्ले

उभादांडा येथील आगळीवेगळी परंपरा असलेल्या गणपती मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीचे काल सागरेश्वर किनारी वाजत गाजत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले. या गणपतीची एक आगळीवेगळी परंपरा असून दरवर्षी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते व होळीच्या आदल्या दिवशी या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. दरम्यान काल रात्री सामूहिक भजन करून वाजत गाजत सागरेश्वर समुद्रात या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा