You are currently viewing दोडामार्ग व सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदाय संघटनेची सभा संपन्न..

दोडामार्ग व सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदाय संघटनेची सभा संपन्न..

दोडामार्ग व सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदाय संघटनेची सभा संपन्न..

जिल्हा ज्ञानेश्वरी पारायणाच्या कार्यक्रमाला सर्व वारकरी बांधवानी, उपस्थित राहण्याच केले आवाहन..

सावंतवाडी

सिंधुदूर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्गशी सलग्न दोडामार्ग व सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदाय संघटनेची सभा सावंतवाडी येथे जिल्हा खजिनदार श्री मधुकर प्रभुगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सदर सभेत संघटनेच्या मागील कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा ज्ञानेश्वरी पारायणाच्या कार्यक्रमाला सर्व वारकरी बांधवानी, उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न करावा याबाबत सर्व वारकरी बांधवाना आवाहन करण्यात आले.

सदर कार्यकारिणीच्या सभेसाठी सावंतवाडी तालु‌का अध्यक्ष हथा प. लक्ष्मण कढव, सचिव ह.भ.प. प्रकाश केळूसकर गुरुजी, सदस्य ह. प.उदय सावंत, ह.भ प.सोमा गावडे, ह. भ. प.-नामदेव पेडणेकर, ह.भ.प. श्यामसुंदर कुमार, ह.भ.प. गोपाळ मांजरेकर जिल्हा कमिटी सद‌स्य ह.भ.प.विलास राणे, ह.भ.प. रामचंद्र गाड ह. भ. प. मदन कुदेकर, ह.भ.प.रमेश सावंत, ह.भ.प. नामदेव सुतार, ह. भ.प भगवान राऊळ,ह.भ.प.मंगेश तेंडोलकर ( ह.भ.प. अरुण परब, ह.भ.प. सुरेशम्हापसेकर, ह. भ. प गणपत राऊळ, ह.भ.प. प्रभाकरनाईक, ट.भ.प. धाकू कोळापते, ह.भ.प.उदय सावंत आदि उपस्थित होते प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ह.भ.प.लक्ष्मण कडव यानी केले व सचिव हभप प्रकाश केळुसकर गुरुजी यानी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा