माजगाव येथे आयटीचा “पायलेट प्रोजेक्ट” होणार सुरू – अन्नपूर्णा कोरगावकर
उद्या होणार भव्य शुभारंभ..
सावंतवाडी
सिंधुदुर्गातील मुलांचं टॅलेंट इकडेच राहावं यासाठी अन्नपूर्णा “टॅक्स सोर्स अँड गो सोर्स च्या” माध्यमातून “आयटी स्टार्टअप” सिंधुदुर्गात प्रथमच सुरू होत आहे. याचे भव्य उद्घाटन उद्या सायंकाळी उद्यनगर येथे होणार आहे याबाबतची माहिती सीओ अन्नपूर्णा कोरगावकर, प्रोप्रायटर ऐश्वर्या कोरगावकर व गो सोर्स सीओ संतोष कानसे यांनी आज येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान सिंधुदुर्गातील मुलांना वाव मिळण्यासाठी आयटीचा पायलेट प्रोजेक्ट सुरू करत आहे यासाठी भविष्यात दहा हजार युवकांना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे. सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.