You are currently viewing सुट्टी लागली शाळेला

सुट्टी लागली शाळेला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सुट्टी लागली शाळेला*

 

सुटी लागली शाळेला

नवा उद्योग शोधला

एका निवांत दुपारी

बेत सुंदर आखला

 

स्नान घालू बाहुलीला

टब मोठ्ठा सापडला

होता पाणी भरलेला

भैय्या गालात हसला

 

धार पाण्याची धरली

जलपात्र पेलवेना

पाणी वाया जाऊ नये

याची काळजी आहेना

 

लक्ष देत काम करी

खूप मज्जा आली ताई

भूक लागली जराशी

करायला हवी घाई

 

थांब थोडा, कळ काढी

जर आत्ता आली आई

उद्या येऊ लवकरी

अस्से होय! बरे बाई !!!

 

विजया केळकर_______

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा