You are currently viewing महायुतीचाच उमेदवार दोन ते अडीच लाखांच्या मताने निवडून येईल

महायुतीचाच उमेदवार दोन ते अडीच लाखांच्या मताने निवडून येईल

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे वक्तव्य

 

कुडाळ :

 

उद्योग मंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भजन मंडळ व दशावतारी मंडळ मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकीय धुळवड नक्कीच सुरू झाली आहे. त्यामध्ये काही लोकांच्या उमेदवारीच्या जागा जाहीर झाल्या असतील तरी महायुतीचाच उमेदवार दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव जरी जाहीर झालं असलं तरी योग्य वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार पूर्ण महाराष्ट्रातल्या उरलेल्या खासदारकीच्या जागांची यादी जाहीर करतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग सुद्धा त्यामध्ये असेल असे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा