खैराची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी तिघे ताब्यात…
सावंतवाडी वन विभागाची कारवाई; २ दिवसाची वन कोठडी…
सावंतवाडी
खैराची अवैद्य वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाने तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून खैराचे लाकूड, गाडी व अन्य साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई काल रात्री बांदा-दोडामार्ग या मार्गावर करण्यात आली. गंगाराम रामा कोकरे (वय ३७), बाबुराव भागू कोकरे (वय ५०) दोघे (रा.निरवडे), अनिल विठ्ठल झोरे (वय २७, रा.डिगस, ता.कुडाळ) अशी त्या तिघांची नावे आहेत. त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता २ दिवसाची वन कोठडी देण्यात आली. ही कारवाई सावंतवाडी वनविभागाच्या पथकाकडून करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडीचे सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड यांचे नेतृत्वाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल मधुकर काशिद, पोलिस हवालदार गौरेश नाईक, वनरक्षक प्रमोद जगताप यांच्या गस्ती पथकाने दोडामार्ग-बांदा रस्त्यावर रात्रगस्त घालत असताना जांभळ्या रंगाची ओमनी ही वाहन संशयास्पदरित्या लाकडांच्या नगांची वाहतूक करीत असल्याचे जाणवले. त्यानुसार संबंधित वाहनाचा पाठलाग करून पानवळ येथे संबंधीताच्या वाहनाला थांबविण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये खैर प्रजातीचे ८ मोठे नग, बॅटरी ऑपरेटेड दोन कटर मशीन, पाळ इत्यादी झाडतोडीचे साहित्य दिसून आले.
*संवाद मीडिया*
*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣
*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹
*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️
*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/
*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️
*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡
*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*
*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*
*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*
*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*