You are currently viewing लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेला भगदाड

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेला भगदाड

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेला भगदाड

कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांचा शिवसेना ( शिंदेगटात ) प्रवेश

कणकवली

जस जशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. तस तशा महायुतीतील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होऊ लागले आहेत. गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी आपल्या शहर प्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राजीनान्यानंतर काही वेळातच प्रमोदशेठ मसुरकर यांनी शिवसेना ( शिंदेगटात ) प्रवेश केला. राजीनाम्या नंतर काही वेळातच प्रमोदशेठ मसुरकर यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, खजिनदार भास्कर राणे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना ( शिंदेगटात ) प्रवेश केला. त्यांच्यावर लागलीच कणकवली शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

 

मागील अनेक महिने ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा बेधडकपणे कामकाज पाहत होते. अचानक त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भल्याभल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याकडे श्री. मसुरकर यांनी राजीनामा दिला आहे. कणकवली शहराचे ठाकरे गटाचे शहर प्रमुख म्हणून मसुरकर कार्यरत होते. ठाकरे गटाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काहीच दिवसात त्यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख म्हणून कार्यरत असताना वरिष्ठाकडून वारंवार डावलण्यात येत असल्याचा आरोप श्री. मसूरकर यांनी केला.

 

प्रमोदशेठ मसूरकर यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये असलेली अंतर्गत गटबाजी देखील या निमित्ताने समोर आली आहे. वरिष्ठांवर केलेल्या आरोपाने पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांना डावलणारे ते वरिष्ठ कोण ? असा देखील सवाल असा उपस्थित केला जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी शेखर राणे, निलेश तेली, नाना सापळे, प्रशांत वनस्कर, सुनील पारकर, चिन्मय रावराणे, मारुती सावंत, बाळू पारकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा