You are currently viewing हनुमंत गड संवर्धन मोहीम २६ व २७ डिसेंबर रोजी

हनुमंत गड संवर्धन मोहीम २६ व २७ डिसेंबर रोजी

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग आणि फुकेरी ग्रामस्थांतर्फे आयोजन 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग आणि समस्त फुकेरी ग्रामस्थं आयोजित हनुमंत गड संवर्धन मोहीम २६आणि २७ डिसेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे.

भेटण्याचे ठिकाण: दौडामार्ग जिल्ह्यातील फुकेरी गावात

ऐतिहासिक हनुमंतगडाचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे असल्याने यामध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे

मोहिमेचे स्वरूप
🔹दि.२६डिसेंबर २०२० रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता स्वतःच्या वाहनाने गडाच्या पायथ्याशी भेटू.
🔹१०:३० सकाळचा चाहा नाश्ता.(गड पायथा)
🔹 १०:३० मोहीम प्रमुख सुनिल दादा, सिंधु दादा यांच्या मार्गदर्शनाखाली गड चढण्यास सुरुवात करू…!! दुपारी ठीक १२:००पर्यंत गड माथा.
🔹 दु.१ वा स्वच्छता मोहिमेस सुरवात होईल.

👉 सोबत आणावे
१) दुर्ग संवर्धन असल्यामुळे एक जोडी कपडे जादा ठेवावे.
२) थंडीचे दिवस असल्यामुळे स्वेटर,मफलर,चादर (बॅनर-गोधडी)सोबत ठेवावे.
३) स्लीपिंग बॅग/मॅट
४)२लीटर पाण्याची कॅन (अत्यावश्यक)
५) सुका खाऊ
६) औषधे चालु असल्यास सोबत आणावी.ग्लुकोन-डी, इलेक्ट्रोल-पावडर,tang
७) डायरी आणि पेन
८)बॅटरी🔦 टाॅच प्रत्येक बंधनकारक दोन सेल जादा मोबाईल पावर बँक सोबत असावी
९)जंगलात चालताना ट्रेक पेन्ट फुल हाताची टिशर्ट आणि चांगले ग्रिप असलेले शुज बंधनकारक
टीप:-कोणतीही मौल्यवान वस्तू सोबत आणू नये,स्वतःच्या सामानाची जबाबदारी स्वतःच घ्यावी.परफ्युम चा वापर कोणीही करू नये.

इच्छुक दुर्गसेवकानी नावनोंदणी फक्त
१) सुनिल राऊळ 9637826315
२) सिद्धेश परब 9404740822
३)रितेश राऊळ 8788876173

टीप – दुर्ग संवर्धनमोहिम आहे कृपया दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीकोनातून यावे हीच विनंती.

🔹एक महत्त्वाच येताना प्रत्येकी दुर्ग सेवकाने घरातुन एक ग्लास तांदूळ एक वाटी डाळ दोन कांदे बटाटे टोमॅटो आणावे.

सिंधुदुर्ग विभाग
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
“घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा
www.sahyadripratishthan.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + fourteen =