*मालवण कथामालेचे कार्य शैक्षणिक क्षेत्राला सदैव मार्गदर्शक – मंदार श्रीकांत सांबारी अध्यक्ष – वैभवशाली श्रीदेव रामेश्वर पतसंस्था आचरे*
मालवण :
“अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे शैक्षणिक, सामाजिक आणि नैतिक कार्य,हे महाराष्ट्र राज्याच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेला सदैव मार्गदर्शनपर आहे;मालवण तालुका कथामालेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले संस्कार, विचार यांचा संचय न करता मेघा प्रमाणे त्यांचा वर्षाव विध्यार्थी, पालक आणि समाजावर केलेला आहे. आज ज्या शाळांचा *आदर्श कथामाला* म्हणून गौरव झाला त्या शाळांच्या संस्कारांतून अनेक शाळांशाळांमध्ये संस्कारांची पिके आणि नितीमत्तेची शेते बहरतील “. असे गौरवोदगार, मंदार श्रीकांत सांबारी -अध्यक्ष वैभवशाली श्रीदेव रामेश्वर पतसंस्था आचरे यांनी कथामाला गौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना काढले.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेने पूज्य साने गुरुजी शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा आदर्श कथामालांचा गौरव *साने गुरुजी नगरी मांगल्य मंगल कार्यालय* आचरा, येथे नुकताच आयोजित केला होता.त्यात पुढील अकरा शाळांचा अनुक्रमे १)कुणकेरी नं १.. सावंतवाडी,२)कलमठ गावडेवाडी.. कणकवली ,3)ओवळीये नं १..मालवण,४)आचरे नं १..मालवण,५)आचरे पारवाडी.. मालवण,६)मसुरे देऊळवाडी.. मालवण,७)मसुरे भोगलेवाडी.. मालवण, ८)आचरे डोंगरेवाडी.. मालवण,९)पळसंब नं १.. मालवण,१०)आचरे बागजामडूल.. मालवण, ११)चिंदर पडेकाप.. मालवण..
अशा कथामाला शाखा गौरविण्यात आल्या.सर्व शाळांच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचा सत्कार शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन, माता पालक संघाच्या कार्यकर्त्यांना अनुक्रमे साने गुरुजींची प्रतिमा आणि गौरवपत्र प्रदान करून आणि कथामाला निवेदक शिक्षक व विध्यार्थी यांचा अनुक्रमे भारतीय संस्कृती आणि श्यामची आई हे ग्रंथ प्रदान करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुरेश ठाकूर *अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण* म्हणाले, महाराष्ट्र माऊली साने गुरुजींच्या मृत्यूनंतर मुलांना कथा सांगणाऱ्या साने गुरुजींचे चालते बोलते स्मारक व्हावे म्हणून, स्वर्गीय प्रकाशभाई मोहाडीकर यांनी पंचाहत्तर वर्षांपूर्वी *साने गुरुजी कथामालेची* स्थापना केली. गेली पन्नास वर्षे ही बिनभिंतीची आणि बिनघंटेची शाळा मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालवीत आहे. मालवण तालुक्यातील नव्वद शाळांमध्ये कथामालेचा उपक्रम चालू आहे. आज त्यांतील अकरा कथामालांचा आदर्श कार्याबद्दल गौरव होत आहे.
प्रमुख मान्यवर म्हणून बोलताना उज्वला धानजी बँक ऑफ महाराष्ट्र कणकवली
म्हणाल्या, आज माझ्या शिक्षक असलेल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ मला सर्व कथामाला निवेदक शिक्षकांना *भारतीय संस्कृती* हा सानेगुरुजींचा ग्रंथ प्रदान करता आला, हाच माझ्या हातांचा *गौरव सोहळा* आहे. असे मला वाटते. श्री संजय माने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मालवण सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, शासनाचा *आनंददायी शनिवार* या उपक्रमाला कथामालेचे हे कार्य नंदादीपासारखे आहे. कथामालेचा हा नंदादीप संपूर्ण मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळांत सदैव तेवत ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
रामचंद्र आंगणे स्वीय सहाय्यक शिक्षणमंत्री महाराष्ट्र’, या अकरा कथामालांचा गौरव करताना म्हणाले, मला माझ्या शिक्षण सेवेत जवळजवळ दोन दशकां पूर्वी ज्यावेळी आ. ठाकूर गुरुजींचे सानिध्य लाभले त्या वेळेपासून मी कथामालेच्या सानिध्यात आहे. कथामालेचा प्रत्येक कार्यकर्ता कोणत्याही पदावर असो, *कथामालेचे कार्य महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरजींचीच सेवा आहे*; या मनोवृत्तीतूनच करतो. यावेळी अशोक कांबळी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरे पंचक्रोशी, निलेश सरजोशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विठ्ठल कदम मुख्याध्यापक कुणकेरी नं १, प्रशांत पारकर मुख्याध्यापक मसुरे देऊळवाडा, आदींची कथामालेचा गौरव करणारी भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर जयप्रकाश परुळेकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आचरे नं १, द. शि. हिर्लेकर गुरुजी ज्येष्ठ कथामाला कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, सुगंधा केदार गुरव केंद्रप्रमुख आचरे आदी मान्यवार उपस्थित होते.
यावेळी कथामाला आजीव सदस्य चंद्रशेखर धानजी चीफ असोसिएट स्टेट बँक कणकवली यांचा ‘पडद्यामागील कार्यकर्ते’ म्हणून,अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कथामाला सल्लागार माधव गावकर,सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरेचे सदस्य लक्ष्मण आचरेकर, बाबाजी भिसळे, सुरेश गावकर तसेच कथामाला कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र सकपाळ, मनाली फाटक, श्रुती गोगटे, ,पांडुरंग कोचरेकर, परशुराम गुरव, नवनाथ भोळे,रामकृष्ण रेवडेकर, कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर ,संजय परब, सायली परब, गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, चंद्रकांत माने, विनोद कदम, अमृता मांजरेकर,नितिन प्रभू, श्रावणी प्रभू तसेच वैजयंती करंदीकर, निलाक्षी गावकर,विजय चौकेकर, विशाखा चौकेकर,मृणालिनी आचरेकर, रश्मी आंगणे,प्रतिभा मयेकर, श्रद्धा वाळके, रसिका तेंडोलकर,अरुण आडे, ,स्वाती भोळे आदी कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आदर्श कथामाला शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामस्थ,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ भोळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुगंधा गुरव यांनी केले.