८५ वर्षावरील वृद्ध व्यक्ती व दिव्यांगाना पोस्टल मतदानाची सोय – प्रांताधिकारी जगदीश कातकर
कणकवलीत पत्रकार, आम्ही कणकवलीकर मतदार जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम
कणकवली
लोकसभा निवडणूक विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदान करावे तसेच एक भाग म्हणून कणकवली तहसील कार्यालय येथे पत्रकार व आम्ही कणकवलीकर नागरिकांच्या सहभागाने मतदार जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली . ८५ वर्षावरील वृद्ध व्यक्ती व दिव्यांगाना पोस्टल मतदानाची सोय असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा कणकवली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी जगदीश कातकर यांनी केली.
कणकवली तहसील कार्यालय येथे मतदार जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम आयोजित कार्यक्रमात ते
बोलत होते .यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे,नायब तहसिलदार प्रिया हर्णे – परब,व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर , प्रवाशी संघटना अध्यक्ष मनोहर पालयेकर, जेष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर,जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष दादा कुडतरकर,मंडल अधिकारी दिलीप पाटील,विलास कोरगावकर,पत्रकार उपस्थित होते.
प्रांताधिकारी जगदीश कातकर म्हणाले,लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या लोकांची संख्या वाढवी,त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.आतापर्यंत विविध कॉलेजमध्ये व अन्य ठिकाणी मतदान वाढीसाठी जनजागृती करण्यात आली आहे.दिव्यांग व्यक्ती आणि ८५ वर्षे वयोवृध्द लोक असतील तर त्यांना पोस्टल मतदान करता येणार आहे.त्यासाठी १२ डी फॉर्म आहे,तो भरला पाहिजे.आता ही मोहीम घेण्यात येत आहे.त्यानंतर ज्यांनी हे अर्ज भरले त्यांच्यासाठी आमचे बूथ लेवल निवडणूक प्रतिनिधी मतदानाचा दिवस निश्चित करतील.त्यानंतर आमचे पथक पोलिंग पार्टीज वेळेनुसार त्या त्या मतदारांच्या पत्त्यावर ओळख पटवून मतदान प्रक्रिया मतदान केली जाईल, पहिली फेरी घेतली जाईल.त्यात न सापडलेल्या मतदारांसाठी पुन्हा दुसरी फेरी असेल.त्यानंतर त्या मतदारांना पुन्हा मतदान करता येणार नाही.यावेळी गरोदर महिला, दिव्यांग,जेष्ठ नागरिक यांनी रांगेत उभे न राहता थेट मतदान करायचे आहे,असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले आहे.