लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेकपोस्टवर SST पथका द्वारे 10 लाखाची रोकड जप्त
पोलीस यंत्रणेचे अजित नाडकर्णी यांनी केले कौतुक
फोंडाघाट :
लोकसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेक पोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान दहा लाखाची रोख रक्कम, चार चाकी जप्त केली आहे. ही कारवाई सकाळी 11:30 सुमारास करण्यात आली आहे. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या चारचाकीमध्ये 10 लाखाची रक्कम आढळून आली. उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री तडवी यांनी पुढील कार्यवाही करता एसएसटी पथक प्रमुख यांच्या ताब्यात दिली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे. यावेळी एसएसटी विभागाचे अधिकारी विश्वास राणे, श्री. बाणे, कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस हवालदार मंगेश बावदाने, पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथी हे उपस्थित होते.
आज फोंडाघाट मधुनच सर्व वाहातुक चालु असलेने, बंदुकधारी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी श्री,अजित नाडकर्णी यांनी चेक पोस्टवर भेट देवुन पोलीस यंत्रणेचे कौतुक करत केले.*