You are currently viewing उद्योजक राजन आंगणे यांचे निधन…

उद्योजक राजन आंगणे यांचे निधन…

उद्योजक राजन आंगणे यांचे निधन…

सावंतवाडी

येथील क्रशर व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक राजन आंगणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हा प्रकार आज दुपारी घडला. ते कारिवडे येथील क्रशर परिसरात असलेल्या आपल्या घरात ते मृतावस्थेत आढळले. सायंकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराकडून कुटीर रुग्णालयात मोठी गर्दी करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री.आंगणे यांच्या आज सकाळी छाती दुखत होते. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे ते आराम करण्यासाठी क्रशर परिसरात असलेल्या आपल्या घरात थांबले होते. दुपारी त्यांनी नेहमीप्रमाणे जेवण घेतले नाही. ऍसिडिटी झाली, असे सांगून त्यांनी नारळ पाणी मागून घेतले आणि ते दुपारी वामकुशी घेण्यासाठी आपल्या घरात गेले. दरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत ते बाहेर न आल्यामुळे तेथे काम करत असलेले कामगार संतोष कळंगुटकर व दत्तप्रसाद कळगुंटकर आदींना संशय आला. यावेळी त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह दिसला. यावेळी ते बेशुद्ध पडले असावेत, असा संशय आल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

याबाबतची माहिती मिळताच माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, नासिर शेख, आनंद नेवगी, बंटी पुरोहित जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, परिमल नाईक, दिलीप नार्वेकर, सुधीर आडीवरेकर, चेतन नेवगी, शरद सावंत, दत्तू नार्वेकर, अरुण भिसे, बाळा चोणकर, समीर पालव, अमित परब, अतुल पेंढारकर, अशोक माळकर, लवू पार्सेकर, बबन डिसोजा, अगस्तीन डिसोजा, जितू पंडित, जगदीश मांजरेकर, सुधीर झुमे, बाळा बोर्डेकर, प्रसाद माने संदीप सावंत, महेंद्र सांगेलकर, अजय गोंदावळे, मुजीब शेख, शुभम केदार, प्रकाश पाटील, बंड्या नेरूरकर, अमेय मोघे, संजय पेडणेकर, मंगेश तळवणेकर, हितेन नाईक, सुशांत पोकळे, प्रसन्न शिरोडकर, सतिश बागवे, शैलेश नाईक, संजय पेडणेकर, रवी जाधव, मकू कशाळीकर, नकुल पार्सेकर आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा