महिला मत्स्य व्यावसायिक संस्थेच्या ४० महिलांना ई- स्कुटरचा लाभ
मालवण,
सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यवसायिक विविध सेवा सहकारी संस्थेच्या ४० महिला सभासदांना ई – स्कूटरचा लाभ संस्थेच्या अध्यक्ष सौ. स्नेहा जितेंद्र केरकर यांच्या नेतृत्वाखाली मिळवून देण्यात आला. यावेळी स्नेहा केरकर यांनी मत्स्य व्यवसाय खात्याच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ महिला सदस्यांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे सांगितले.
यावेळी हिरांगणी केळुस्कर, पल्लवी मोर्जे, प्रीती कोयंडे, राजलक्ष्मी शिरोडकर, संध्या गोवेकर, चैताली धुरी, प्रतिभा कोयंडे, अपर्णा धुरी, स्वीटी मोहिते, दिपाली मयेकर, स्नेहा पेडणेकर, भारती पेडणेकर, प्रचिती पाटकर, सानिका कुपकर,
हर्षलता मांजरेकर, दिपा बिलये, विशाखा करवडकर, अनिता भोवर, अक्षता गोसावी, स्नेहल टिकम, रतन आचरेकर, संगीता देसाई, सुचिता खांदारे, रक्षिता गोवेकर, शिवानी पेडणेकर, प्रणिता तांडेल, सुमित्रा चिपकर, मुग्धा धुरी, दीपिका घाटवळ या लाभार्थ्यांसह सभासद महिला उपस्थित होत्या. यावेळी क्यार वादळासाठी देण्यात आलेल्या रू. ६ हजार या सानुग्रह रक्कमेचा लाभ मिळण्यासाठी वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी सादर करण्यात आली.