*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मद्यपीची अंतयात्रा!*
आयुष्यभराची साथ आमची
एक आमच्यातला वर निघाला
चार प्याले दिवसरात्र किणकिणले
आमच्यातला एक कमी झाला ..!
पोचवायला त्याला आम्ही निघालो
तिरडीला खांदा तिघांनी दिला
वाटेतच मित्र उठून बसला
त्याच्या नावाने पेग आम्ही रिचवला..!
कधी नव्हे ते!आम्ही खरं रडत होतो
खांद्यावर तो एकटा हसत होता
गळा त्याचा होता जरी कोरडा तरीही
गप्प राहायलाओठांना शिकवत होता.!
वरूनच आम्हा तिघांना होता सांगत
लवकर वर या रे!तुमची वाट पाहातो
तुमच्याविना राजांनो!मैफील ही कशी
येण्यापूर्वीच तुमची मस्त सोय करतो..!
घाई आम्हाला नाही!त्याला होती
उठून सरणावर जाऊन झोपला
त्याच्याभोवती आम्ही कोंडाळा केला
तुळशीपत्र ओठातून काढून छोटा घोट त्याला दिला…..!
मित्रा !आयुष्याच्या चितेवर राख होतोय
बिचा-या त्या लाकडांना शिक्षा कशाला
कमंडलूतुन अमृत अंगावर ओतलं
वर बघा!आमचा यार उडत निघाला..!
बाबा ठाकूर धन्यवाद