*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”सागर”*
समुद्र उधाणतोच होऊ लाटांवर स्वार
शांत होऊन उभे राहूया किनाऱ्यावरIIधृII
चिंता करण्याने काही न मिळते घरघर
चिंता टाळल्याने पुढील मार्ग होतो सुकर
येणाऱ्या आव्हानांना सामर्थ्ये जाऊया समोरII1II
भोग भोगून संपवावे लागती सांगे संत सार
प्राप्त परिस्थिती आपोआप जाते काळ उत्तर
नियंत्रण ठेवू शकत नाही सर्व गोष्टींवरII2II
भावनांच्या आवेगा योग्य दिशेनं घालू आवर
सकारात्मक ऊर्जादी गोष्टींचा करू स्वीकार
वेळ दवडू नये उगा निरर्थक प्रश्नांवरII3II
काळजी करू नये काळजी घ्यावी जरूर
भरती ओहोटी चालूच राहते निरंतर
उदार ऊमदेपण स्वीकार शिकवे सागरII4II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.