You are currently viewing अंगणवाडी स्तरावरील कामकाज झाले ‘स्मार्ट’…

अंगणवाडी स्तरावरील कामकाज झाले ‘स्मार्ट’…

अंगणवाडी स्तरावरील कामकाज झाले ‘स्मार्ट’…

अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना 1 हजार 588 स्मार्ट फोनचे वाटप..

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 1 हजार 539 अंगणवाड्या कार्यरत असून या अंगणवाडयांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका तसेच बीट स्तरावर कार्यरत असलेल्या 49 पर्यवेक्षिका असे एकूण 1 हजार 588 स्मार्टफोनचा पुरवठा राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे.
या स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचे असून मोबाईल सोबत चार्जर, बॅक कव्हर, स्क्रीन गार्ड व अन्य आवश्यक बाबी पुरविण्यात आल्या आहेत. सदर मोबाईलचा उपयोग अंगणवाडी स्तरावरील ऑनलाईन दैनंदिन कामकाज करण्यासाठी होणार असून त्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता व गतिमानता येणार असल्याचे माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांनी केले आहे.
०००००

प्रतिक्रिया व्यक्त करा