You are currently viewing फोंडाघाट परिसरातील जीर्ण विद्युत पोल व वाहिन्या तातडीने बदलाव्या; अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा भाई हळदीवे यांचा इशारा

फोंडाघाट परिसरातील जीर्ण विद्युत पोल व वाहिन्या तातडीने बदलाव्या; अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा भाई हळदीवे यांचा इशारा

फोंडाघाट परिसरातील जीर्ण विद्युत पोल व वाहिन्या तातडीने बदलाव्या; अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा भाई हळदीवे यांचा इशारा

फोंडाघाट

फोंडाघाट रहदारी परिसरातील जीर्ण झालेले लोखंडी विद्युत पोल आणि भारांकित जीर्ण विद्युत वाहिन्यांमुळे दुर्घटना होऊन वित्त आणि जीवितहानी होण्याची दाट शक्यता असून तात्काळ जीर्ण झालेले आणि व विद्युत वाहिन्या बदलून उपाययोजना करावी अन्यथा ग्रामस्थांसह उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र उर्फ भाई हळदीवे यांनी महावितरण चे शाखा अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
फोंडाघाट परिसरातील 80 टक्के विद्युत पोल व विद्युत वाहिन्या जीर्ण झालेल्या आहेत. कित्येक ठिकाणचे विद्युत पोल पूर्णपणे गंजलेले असून विद्युत वाहिन्यांना एकापेक्षा जास्त जोड असल्याने विद्युत वाहिन्यांच्या तारा खाली लोंबकळत असून वादळ वारे व पाऊसाच्या काळात एकमेकांवर घासून शॉर्ट होऊन तुटून खाली पडण्याची व त्यामुळे जीवितहानी तसेच वित्तहानीही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान यातील बहुतेक जीर्ण पोल व जीर्ण विद्युत वाहिन्या फोंडाघाट बाजारपेठ व फोंडाघाट हायस्कूल रोड मार्गांवर असून यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका संभावतो तसेच हे जीर्ण झालेले विदयुत पोल काही ठिकाणी पूर्ण गंजुन वाकले असल्याने येथील विद्युत कर्मचाऱ्यांनाही पोल वर चढतांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
तरी याबाबत तातडीने उपाययोजना करून जीर्ण झालेले पोल व जीर्ण विद्युत वाहिन्या येत्या 4 ते 5 दिवसात बदलून द्याव्या अन्यथा फोंडाघाट मधील ग्रामस्थांना घेेऊन उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील समाजिक कार्यकर्ते भाई हळदिवे यांनी एका निवेदनाद्वारे येथील महावितरण चे शाखा अभियंता यांना दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा