You are currently viewing मृगजळ

मृगजळ

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वप्नगंधा सतिश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मृगजळ*

 

अरे वेड्या कां धावसी सुखामागे

ते तर आहे मृगजळ खोटे,

तहानलेल्या तुझ्या मनाची तृष्णा

अतृप्त राहणारे हे दुःख मोठे

🌵

वाळवंटी उगवती काटेरी निवडुंग

नको अपेक्षा तिथे तुज मिळेल

मोगरा,मदनबाणाचा मोहक सुगंध

रखरखत्या उन्हात काया जळेल.

🪸

जरीवर कुणी लेपलावी चंदनाचा

गारवा नसे तो अंतर्मनाचा

जगी असे हा खेळ दिखाव्याचा

वरवरचा असे वर्षाव मायेचा.

🌧️

वाळू जरी दिसे , चमकती रुपेरी

परी चटके बसती पायतळी,

कां घ्यावा विसावा या मृगजळी

फसव्याआभासी पडूनये बळी.

 

वेड्या मानवा तू किती चालसी

सुख शोधीत ठायी ठायी

सावली बनुनी दुःख येतसे‌ सोबती

मृगजळासम पायी पायी

 

स्वप्नगंधा सतीश ‌आंबेतकर

मुंबई. विरार .

प्रतिक्रिया व्यक्त करा