*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आईपण पेलतांना…*
आईपण पेलतांना जीवा होते घालमेल
सांभाळावा कसा सांगा आयुष्याचा तोल ..
आईपण पेलतांना जीवा होते घालमेल…
सखे सोयरेही सारे टाकतात भार
नको नको होतो जीव कधी होते हार
हार पेलवत नाही पडे आगीत ते तेल…
आईपण पेलतांना जीवा होते घालमेल…
निसर्गाने अन्यायच केला नारीवर
बोजा वाढवून केली तिला कमजोर
शिणवटा येतो जीवा होते कलकल…
आईपण पेलतांना जीवा होते घालमेल….
स्वीकारले परी तिने जे जे आले भोग
तारेवर कसरत केली रोज रोज
समतोल जीवनाचा साधे अनमोल
आईपण पेलतांना जीवा होते घालमेल…
आई सारखी ना कोणी रत्नांची ती खाण
तिच्या पोटी जन्म घेई विष्णु भगवान
जगातली सुंदर ती अमृताची वेल…
आईपण पेलतांना जीवा होते घालमेल…
कष्ट करण्याची सव अंगी मुरलेली
हिणवली ताडिली ती अर्धमेली केली
हसता हसता सारे झेलती ते झेल …
आईपण पेलतांना जीवा होते घालमेल..
प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक
(९७६३६०५६४२)