You are currently viewing डी.एल.एड. 2020-21 शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन प्रवेशाच्या जागा भरण्यासाठी अर्ज सादर करावेत

डी.एल.एड. 2020-21 शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन प्रवेशाच्या जागा भरण्यासाठी अर्ज सादर करावेत

– संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे                                                  

सिंधुदुर्गनगरी

शासकीय कोट्यातील डी.एल.एड. प्रथम वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक पदविका (D.EI.ED) शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या जागा भरण्यासाठी अर्ज सादर करावेत. असे आवाहन, अध्यक्ष राज्यस्तीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समिती, पुणे तथा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी केले आहे.

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील पदे भरण्यासाठी एकुण 3 फेऱ्या घेण्यात आल्या होत्या तथापी अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल.  यासाठी विद्यार्थ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबतची अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता-12 वी उत्तीर्ण खुला प्रवर्ग 49.5 टक्के व खुला प्रवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5 टक्के गुणांसह, प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दिनांक 22 ते 26 डिसेंबर 2020, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणीकरणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश व प्रत्र प्राप्त करणे दिनांक 22 ते 27 डिसेंबर 2020, प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन) खुला संवर्ग 200 रुपये व खुला संवर्ग वगळुन इतर सवंर्ग 100 रुपये असेल.

ज्यांनी यापूर्वी अर्ज भरुन Approve करुन घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेशप्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे.विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ई-मेल लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे. व त्यांनतर अध्यापक विद्यालयात 4 दिवरसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर (D.EI.ED) प्रवेशासाठी कोणऱ्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी. असे आवाहन, अध्यक्ष राज्यस्तीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समिती, पुणे तथा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा