You are currently viewing “सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे समाजातील सुसंवाद कमी होत चालला आहे” -डॉ.मुकुंद करंबेळकर

“सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे समाजातील सुसंवाद कमी होत चालला आहे” -डॉ.मुकुंद करंबेळकर

निगडी प्राधिकरण-(सांस्कृतिक प्रतिनिधी)

 

दि. १० मार्च २०२४ रोजी मनोहर वाढोकर सभागृह, निगडी येथे शब्दरंग कला साहित्य कट्ट्याचा तृतीय वर्धापन दिन साजरा झाला. चाळीसगावच्या रंगन्यास कला संस्थेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबेळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री अशोक अडावदकर यांनी त्यांचा परिचय करून दिला.

सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे समाजातील सुसंवाद कमी होत चालला आहे. तो साधण्यासाठी शब्दरंग सारख्या संस्थांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन डॉ करंबेळकर यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केली.

ज्येष्ठ पत्रकार बाबू डिसुझा यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यांचा परिचय, शब्द रंगचे संस्थापक अध्यक्ष, श्री. चंद्रशेखर जोशी यांनी करून दिला.

श्री सुभाष भंडारे आणि श्री सतीश सगदेव यांनी P.P.T च्या माध्यमांतून गेले वर्षभर कट्ट्यावर झालेल्या कार्यक्रमाचा धांडोळा मांडला.

शब्दरंगच्या सभासदांनी या प्रसंगी उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली . कु क्षिप्रा पटवर्धन हिने सुंदर गणेश वंदना सादर केली.

बजावो ढोल स्वागत मे,मेरे घर राम आये है,या गाण्यावर सुंदर नृत्य प्रस्तुती झाली. त्यानंतर माधुरी ओक व विनिता श्रीखंडे यांनी साठी वरील एका गाण्यावर सुंदर नृत्य प्रस्तुती सादर केली.

आपले मराठी महिने व त्यातील सणवार आणि मंगळागौरीचे खेळ, अशी संकल्पना घेऊन सौ प्राजक्ता निफडकर यांनी उत्तम सादरीकरण केले.

सौ नंदिनी वीरकर आणि सहकाऱ्यांनी जुन्या हिंदी गाण्यावर फ्युजन नृत्य सादर केले,प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

कुसुम जाधव आणि अलका भालेकर यांनी सासुसूनेवर विनोदी स्किट सदरात केले.

श्री युवराज गायधनी आणि श्री चंद्रशेखर जोशी यांनी गदिमांच्या कवितेचे वाचन केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पु ल देशपांडे यांच्या ” सांत्वन ” या एकांकिकेचे सादरीकरण झाले. यामध्ये, चंद्रशेखर जोशी, कविता देशमुख, सुभाष भंडारे , सतीश सगदेव, अनुराधा पेंडुरकर, ज्योती कानेटकर , अशोक अडावदकर या कलाकारांनी उत्तम अभिनय केला. अशोक अडावदकर यांनी दिग्दर्शन केले.

रसिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला.

प्रियांका आचार्य यांनी सुंदर सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा