You are currently viewing वैचारिक देवाणघेवाणीतून महिला घडतात – संदीप जाधव

वैचारिक देवाणघेवाणीतून महिला घडतात – संदीप जाधव

*वैचारिक देवाणघेवाणीतून महिला घडतात – संदीप जाधव*

*राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे जागतिक महिला दिन साजरा*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महिला सक्षम व्हायच्या असतील तर आधी त्या संघटित झाल्या पाहिजेत, खरंतर वैचारिक देवाणघेवाणी मधूनच त्या घडत असतात, असे प्रतिपादन कामगार शिक्षक संदिप जाधव यांनी जागतिक महिला दिनी केले.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने घरेलु महिला कामगार आणि गिरणी कामगार महिलांचा मेळावा मनोहर फाळके सभागृह, परेल येथे आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जागतिक कामगार महिला दिनी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी शुभेच्छा दिल्या. संघटनेचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी महिलांचे स्वागत केले.

संदीप जाधव यांनी आपल्या भाषणात, महिलांच्या बचत गटाचे फायदे तसेच त्यांच्या सक्षमी करण्यावरही मार्गदर्शन केले. या प्रसंगी (उबाठा) शिवसेनेच्या अलिबाग महिला संपर्क प्रमुख, संघाच्या प्रतिनिधी दीक्षा गुंजाळ, जी.डी.आंबेकर कॅटरिंग कॉलेजच्या शिक्षिका विभा मोरे, वाचनालयाच्या ग्रंथपाल ममता घाडी, संघटनेच्या प्रतिनिधी रुपाली राजपुरे, शैला पाटील, मेघना आसबे, श्रावणी पवार यांनी आपल्या भाषणात महिलांच्या विविध समस्यांना वाचा फोडली. याप्रसंगी आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी.बी.गावडे, जनसंपर्क प्रमुख लेखक काशिनाथ माटल देखील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा