मालवण :
वाचन कला विकास समिती, त्रिंबक संचालित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक, ता. मालवण यांनी कै. दादा ठाकूर (आचरे-पारवाडी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले असून या स्पर्धा रविवार दि २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वा. जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहात घेण्यात येणार आहेत.
दि. १/१/२०२४ पूर्वी स्पर्धकाने वयाची १७ वर्ष पुर्ण केलेली असावीत. १७ वर्षावरील जिल्ह्यातील कोणीही स्पर्धक सदर स्पर्धेत सहभाग घेवू शकतो. कमाल वयोमर्यादेचे बंधन नाही.
स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे (त्यापैकी कोणताही एक विषय निवडणे
१) अंधश्रध्दा निर्मूलन काळाची गरज
२) सुशिक्षित होवूया की सुसंस्कृत?
३) चांद्रयान मोहिम आणि भारत.
४) छत्रपती शिवराय जाणता राजा.
वक्तृत्व सादरीकरणाची वेळ – किमान ६ मिनिटे व कमाल ८ मिनिटे असून त्यांचे मूल्यमापन १) सभाधिटपणा – ५ गुण, २) विषय मांडणी, प्रतिपादन – २५ गुण. ३) वाचिक, आंगिक अभिनय – १० गुण, ४) प्रेरणादायी आरंभ व आकर्षक शेक्ट – ५ गुण, ५) आत्मविश्वास – ५ गुण असे ५० गुणांचे असेल. मात्र परिक्षण समितीचा निर्णय सर्व स्पर्धकांना बंधनकारक आहे. विजेत्या स्पर्धकांना संस्थेमार्फत अनुक्रमे प्रथम क्रमांक – २००० रुपये, द्वितीय क्रमांक – १५०० रुपये, तृतीय क्रमांक – १००० रुपये आणि स्मृतीचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात येईल. १० स्पर्धकांच्या वर सहभाग असेल तर उत्तेजनार्थ ५००रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रवास खर्च प्रत्येक स्पर्धकाने आपला आपणच करावयाचा आहे. पहिल्या १५ स्पर्धकांना प्रवेश देण्यात येईल. प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क दिनांक २५ मार्च २०२४ पर्यंत पोच करावेत. प्रवेश शूल्क प्रती स्पर्धक ५० रुपये असून सादरीकरणानंतर स्पर्धकांना ते परत करण्यात येईल.
स्पर्धेबाबत सविस्तर माहितीसाठी खालील व्यक्तींपैकी एकाशी संपर्क साधावा.
१) श्री. सुरेंद्र सी. सकपाळ (अध्यक्ष)- ९४२३३०१५८४, ९४२१६४६१५३
२) अमेय अ. लेले (ग्रंथपाल) – ९४२०६८४६१२
३) विवेक म. जाधव – ९४२०७६३०१९
स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता व संपर्क क्रमांक टाईप करून टाकणे. आपणास योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. आपला संपर्क झाल्यानंतर आपल्यास प्रवेश अर्ज वाॅटस्ऍप नंबरवर पी. डी. एफ्. स्वरुपात पाठविण्यात येईल, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे.