You are currently viewing भाजपाच्या ” शक्तिवंदन अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत महीलांची पदयात्रा

भाजपाच्या ” शक्तिवंदन अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत महीलांची पदयात्रा

*भाजपाच्या ” शक्तिवंदन अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत महीलांची पदयात्रा*

*शक्तिवंदन अभियान पदयात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयजयकार !!!*

राष्ट्रीय महामंत्री व शक्तिवंदन अभियान प्रमुख मा.तरुण चुग , राष्ट्रीय सचिव व शक्तिवंदन अभियान सहप्रमुख मा.विजयाताई रहाटकर यांच्या मार्गदर्शनात ” शक्तिवंदन अभियान ” देशभरात आयोजित करण्यात आले आहे . हे अभियान जिल्हा , तालुका व गावपातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन राबविण्यात येत आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,अभियान संयोजक प्रसन्ना देसाई व महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन हे अभियान गावपातळीवर विविध कार्यक्रम आयोजित करून पोहचवीले आहे .
या अभियानाचा जिल्हास्तरीय मेळावा महीला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो महीला , CRP , NGO यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . यानंतर या अभियानाच्या पुढच्या टप्प्यात दिनांक ४ / ५ / ६ मार्च रोजी ” शक्तिवंदन मॅरेथॉन ” यामध्ये नवमतदार , NCC , NGO , बचत गटातील महीला सहभागी झाल्या .
त्यानंतर ” शक्तिवंदन पदयात्रा ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा गावामध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले . यामध्ये सर्वप्रथम जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांसाठी आणलेल्या सर्व योजनांची माहीती उपस्थितांना दिली . तसेच मातृवंदना , उज्वलागॅस , आयुष्यमान भारत , स्वनिधी कर्ज योजना , लखपती दिदि अशा अनेक योजनांबाबत सर्विस्तर चर्चा केली .
यावेळी अभियान प्रमुख प्रसंन्ना देसाई , जि.का.का.सदस्य स्मिता दामले व सारीका काळसेकर , ग्रामपंचायत सदस्या स्वरा देसाई – कार्तिकी पवार – सुहीता हळदणकर – अरुणा गवंडे , महीला मोर्चाच्या अंकिता देसाई व शांती देसाई , मनाली चुडजी , मनस्वी गावडे , श्वेता करंगुटकर , सुषमा दळवी , मिताली नाईक , श्रद्धा बोवलेकर , श्रद्धा कांबळे , सुप्रिया येरम , विणा पाटकर , अर्चना मांजरेकर , स्मिता गावडे , रुपाली रेडकर , उज्वला कोंडुसकर इत्यादी CRP , स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव व सदस्य सहभागी झाले होते .

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇

———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा